Home आरोग्य नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो – CAIT

नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो – CAIT

0

कोरोना मुळे समस्त जनता घाबरलेली आहे. अशात व्यवहार करणंही अशक्य झालं आहे. नोटांमुळे कोरोना प्रादुर्भाव होतो का? असा वारंवार प्रश्न पडतो. मात्र फायनली रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. झी २४ तासच्या एका रीपोर्ट नुसार रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाने सांगितले आहे कि कोरोना संक्रमण नोटांनी देखील होऊ शकते. नोटांनी दैनंदिन व्यवहार केल्याने कोविड१९ चे विषाणू तुमच्या शरीरापर्यंत पोहोचू शकतात असे इंडस्ट्री बॉडी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडीया ट्रेडर्स ने म्हटलंय. यालाच आरबीआयने देखील दुजोरा दिलाय.

संक्रमण थांबवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे डिजीटल पेमेंट असल्याचे आरबीआयने सुचवले आहे. परिणामी रोख रक्कमेशी प्रत्यक्षात संपर्क येणार नाही व कोरोना संक्रमणाचा धोका कमी होईल. नागरिकांनी कॅश व्यवहारांकडून डिजिटल व्यवहाराकडे वळण्यासाठी सवलत देण्याच्या योजनाही देण्याबाबत आरबीआयने सांगितलं आहे.