“भारतातील परिस्थिती ही सध्या गोंधळाची आहे आणि प्रत्येक जण या पुढे काय या कोड्या मध्ये गुंतून पडला आहे. बांधकाम क्षेत्रातील मजूर असोत वा धारावी झोपडपट्टीतील राहणारे नागरिक ही हातावर पोट असलेली माणसे त्यांची बचत किंवा साधने संपल्यानंतर काय करतील? जर हे लोक रस्त्यावर उतरले तर त्याला कोण जबाबदार असेल?” असे बॅनर्जी म्हणाले.
भारतातील सध्या सुरू असलेल्या उपाययोजना ह्या काही वाईट नसल्या तरी यांची अंमलबजावणी बरोबर झाली नाही तर फार मोठ्या संकटाला आपण जबाबदार असू. भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कोरोना थांबवने अशक्य आहे जसे की झोपडपट्टी इलाक्यांचे उदाहरण घेता येईल.
“आपण लॉकडाउन हे हा आजार फार लोकांच्या पर्यंत पोहोचण्या आधीच लागू केला म्हणून साहजिक आहे की जेव्हा २१ दिवसानंतर जेव्हा लॉकडाउन संपुष्टात येईल तेव्हा कुणाकडेच या रोगा विरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती नसेल आणि याचा प्रोबेशन कालावधी हा १४ दिवसांचा असल्यामुळे लगेचच या आजार पसरण्याचा वेग वाढता असेल. यामुळे आपण लॉकडाउन ठेऊन या आजाराला संपवत नसून फक्त यावर काय उपाययोजना करता येतील याच्या विचारासाठी तात्पुरता वेळ मागून घेत आहोत.” असे मत नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले.