Home राजकीय दंगल गर्ल बबीता फोगाट उतरणार विधानसभा निवडणूकीच्या आखाड्यात

दंगल गर्ल बबीता फोगाट उतरणार विधानसभा निवडणूकीच्या आखाड्यात

0
geeta fogat

२०१६ साली आमीर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटातून गीता आणि बबीता फोगाट या कुस्तीपटू बहिणींची कहाणी सर्वांसमोर आली. त्यातील बबीता फोगाट हिने अलीकडेच पोलीस सेवेचा राजीनामा दिल्याने ती हरियाणा विधानसभेतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालली आहे.

२९ वर्षीय बबीताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २०१४ आणि २०१८ साली सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच २०१२ साली जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेतही तिने कांस्यपदक मिळवले आहे. गेल्या काही वर्षांपासून बबीता हरियाणा पोलीस सेवेत कार्यरत होती. १२ ऑगस्टला वडील महावीर फोगाट यांच्या समवेत तिने भाजपात प्रवेश केला आणि १३ ऑगस्टला पोलीस सेवेतून निवृत्ती घेतली. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू उपस्थित होते. हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवायची असल्याने नोकरी सोडल्याचे तिने सांगितले. बबीता चरखी दादरी विधानसभा मतदानसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.