Home राष्ट्रीय १९९८ साल ठरले असते दाऊदसाठी शेवटचे! मशिदीसमोरचं होणार होता खेळ खल्लास, वाचा...

१९९८ साल ठरले असते दाऊदसाठी शेवटचे! मशिदीसमोरचं होणार होता खेळ खल्लास, वाचा सविस्तर

0

“आमचा प्लॅन यशस्वी झाला असता तर दाऊद चा खात्मा १९९८ मध्येच होता. पण ऐनवेळी नेपाळच्या खासदाराने दाऊदला टीप दिली आणि दाऊद सटकला!” हे शब्द आहेत मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अजीज लक्कडवालाचे. अजीजच्या नावावर २७ खून व ८० खंडण्यांचे गुन्हे हे फक्त मुंबईत दाखल आहेत! एकेकाळी छोटा राजनचा खास असलेल्या अजीजला मुंबई पोलिसच्या पथकाने लखनौ मधून अटक केली आहे.

मुंबई पोलिसांशी बोलतांना लक्कडवलाने त्यांच्या १९९८ च्या दाऊद च्या हत्येच्या कटाचा खुलासा केला, दाऊदची मुलगी मारिया हिचा मृत्यू झाला होता. त्या वेळी दाऊद हा कराची येथील एका दरग्यात आला होता. आम्ही दबा धरुन बसलो होतो. मात्र, नेपाळचा खासदार मिर्झा बेग याने दाऊदला टीप दिली आणि गामचा गेम फसला. नानाचा खास शूटर विकी मल्होत्रा हा आमचा म्होरक्या होता, अशी माहिती एजाज लकडावाला याने मुंबई पोलिसांना सांगितले आहे. आम्हाला संधी मिळाली असती तर, तेव्हाच दाऊद इब्राहिम संपला असता असेही लक्कडवाला याने म्हटले आहे.