माजी सैनिकांवर हल्ला करणे ही अपमानजनक आणि लाज वाटणारी गोष्ट आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले. सद्या मुंबई चे वातावरण बरे नाहीये त्यातच मदन शर्मा या माजी नौदल सैनिकावर हल्ला झाला आहे.
या घटनेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही मदन शर्मा यांच्याशी चर्चा केली आहे. माजी सैनिकांवर हल्ले पूर्णपणे स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
माजी सैनिकांवर हल्ले स्वीकारार्ह नाहीत आणि अपमानजनक आहे. यावर देवेंद्र फडणवीस बोलले की ही अत्यंत चुकीची आणि राज्य पुरस्कृत दहशतवादी परिस्थिती आहे. तसेच ते बोलले की त्यांच्या ट्विट ने त्यांनी त्यांचं लक्ष गुंडाराजकडे वेधले आहे. १० मिनिटांत ६ आरोपींना सोडण्यात आले.
मदन शर्मा यांची कन्या शीला शर्मा यांनी शिवसेनेवर दोषारोप करताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे आवाहन केले. तिचे वडील मदन शर्मा यांना धमक्या येत असल्याचा दावा शीला यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित व्यंगचित्र शेअर केल्याच्या आरोपावरून मदन शर्मा यांच्यावर हल्ला झाला आहे.