Home राष्ट्रीय अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात देताना झालेला उशीर, पाकिस्तान कडून धक्कादायक गोष्ट समोर

अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात देताना झालेला उशीर, पाकिस्तान कडून धक्कादायक गोष्ट समोर

0

प्राईम नेटवर्क : गेले साठ तास देश ज्या वीरा साठी मायभूमीत परतण्याची वाट पाहत होता, तो म्हणजे भारतीय हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन, रात्री तब्बल 9 वाजून 21 मिनिटांनी भारतीय भूमीवर त्यांचे पाय पडले. त्यांना तेथून पुढे वैद्यकीय चाचणीसाठी पुढे नेण्यात आले. जवळपास 12 तासांपेक्षा पाकिस्तानने त्यांना ताटकळत ठेवलं. या दरम्यान एक धक्का दायक गोष्ट समोर आली. पाकिस्तानवर आंतर राष्ट्रीय दबाव वाढल्याने कमांडर अभिनंदन यांना जिनिव्हा करारा नुसार भारताकडे सोपवावे लागले.

कारण जेव्हा समजलं, तेव्हा ते अतिशय धक्कादायक होतं

शुक्रवारी सांयकाळी त्यांना सोपवण्याची वेळ असताना त्यांना सोडण्याची वेळ तब्बल दोन वेळा पुढे ढकलली. याचं कारण जेव्हा समजलं, तेव्हा ते अतिशय धक्कादायक होतं. या दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला, या व्हिडिओ मध्ये अभिनंदन यांना काय बोलायला लावलं, हे अद्याप समजू शकलं नाही. या व्हिडिओ मध्ये पाकिस्तान त्यांना हवे ते मुद्दे अभिनंदन यांच्याकडून वदवून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या व्हिडिओचं आंतरराष्ट्रीय स्तरावर पाक भांडवल करणार असल्याचं समजतं.

भारताने पाकिस्तानवर टाकलेला दबाव भारताच्या कमी आला

दरम्यान शुक्रवारी रात्री पाकिस्तानने अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्द केलं, यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, यांनी त्यांचं ट्विट करून स्वागत केलं. भारताने पाकिस्तानवर टाकलेला दबाव भारताच्या कमी आला, आणि पाकने अभिनंदन यांना 48 तासातच सोडून देणार असल्याचं जाहीर केलं, त्यामुळे हा भारताचा कूटनीतिक विजय मानला जातोय.