Home राष्ट्रीय VIDEO : एका वाहन चालकाच्या क्षुल्लक चुकीमुळे पी. चिदंबरम झाले आहेत गजाआड…...

VIDEO : एका वाहन चालकाच्या क्षुल्लक चुकीमुळे पी. चिदंबरम झाले आहेत गजाआड… पहा हे कसं झालं

0

गुन्हेगार कितीही चलाख असला तरी त्याचा गुन्हा फार काळ लपून राहू शकत नाही. योगायोगाने का होईना पण त्याचं कुकर्म एक दिवस उघडकीस येतंच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे निकटची घडलेली एक घटना ज्यात वाहनचालकाच्या एका क्षुल्लक चुकीमुळे देशातील सर्वात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आणि त्याचमुळे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना तुरुंगाची हवा खावी लागत आहे. वाहनचालकाने सिग्नल तोडला नसता, तर चिदंबरम हे ‘ईडी’च्या जाळ्यात फसलेही नसते. हे अगदी चित-पटाचा स्टोरी सारखं वाटत असलं तरी खरं आहे. चला तर मग पाहुयात काय आहे हे सविस्तर प्रकरण…

मुबंईत कार्टर रोडवर एका वाहनचालकाने सिग्नल तोडल्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी त्याला पकडले. चौकशी केली असता तो अतिशय घाबरलेला आढळला. त्यामुळे त्याची गाडी तपासण्यात आली. गाडी तपासल्यानंतर गाडीत एक धारदार चाकू सापडला. वाहनचालक अजूनच घाबरला आणि ‘आता आपल्याला तुरुंगवास होणार’ या भीतीने त्याच्या तोंडातून इंद्राणी मुखर्जी यांचे नाव निघाले. पोलिसांना त्याच्या वर्तणुकीवर संशय आला. नक्की काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी कसून चौकशी केली असता इंद्राणी मुखर्जी हिने शीना बोरा या तिच्या बहिणीची हत्या केली असल्याचे त्याने सांगितले. इंद्राणी मुखर्जी एक प्रसिद्ध मीडिया एक्सिक्युटिव्ह तसेच एच.आर. कन्सल्टंट आहे. मोठ्मोठ्या उद्योजक, सेलिब्रिटीज पासून राजकीय नेत्यांपर्यंत तिची ओळख आहे.

पीटर मुखर्जी यांच्याशी लग्न केल्यानंतर इंद्राणीला एक नवी ओळख मिळाली. पुढील तपासणीत असे लक्षात आले की शीना ही इंद्राणी मुखर्जी आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दास यांची मुलगी आहे. जेव्हा कळलं शीना इंद्राणीची बहीण नसून मुलगी आहे तेव्हा पोलिसांना इंद्राणी आणि तिची मुलगी शीना बोराच्या जॉइंट अकाउंटची माहिती मिळाली. ज्यात इंद्राणीने मुलीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केलेले होते. ते पैसे शीना बोराने परत करायला नकार दिल्यामुळे इंद्राणीने मुलीची हत्या केली असे पोलिसांच्या निदर्शनात आले.

मुलीच्या हत्येनंतर इंद्राणीने मुलीच्या अकाउंटवर पाठविलेले पैसे ब्रिटनला पाठविण्याचा प्रयत्न केला आणि हीच लिंक पनामा अकाउंटला मिळाली व तिचं कुकर्म उघडकीस आलं. शीना बोराच्या हत्येचं प्रकरण जेव्हा सीबीआयकडे सोपवण्यात आलं तेव्हा इंद्राणी मुखर्जीला आरोपी ठरवण्यात आलं. इंद्राणी अटकेनंतर सरकारी साक्षीदार बनली. पुढे एकेका गोष्टीचा खुलासा होत गेला. काँग्रेस, चिदंबरम, एनडी टीव्हीचा मालक, काळा पैसा, पती पीटर मुखर्जीच्या आयएनएक्‍स मीडियाच्या माध्यमातून पनामा अकाउंटवर जमा केलेले पैसे आणि लाच दिलेल्या संपूर्ण प्रकरणाचा तिने भांडाफोड केला. चिदंबरम यांचा मुलगा कार्तीच्या अकाउंटवर देश-परदेशातील स्वयंसेवी संस्था आणि भारतातील काही उद्योगपतींकडून जमा झालेल्या पैशांचा स्रोत मिळाला आणि आता चिदंबरम पिता-पुत्र दोघांना जेलची हवा खावी लागत आहे. फक्त एका वाहन चालकाने सिग्नल तोडल्याच्या किरकोळ घटनेमुळे आज देशाचा माजी अर्थमंत्री गजाआड आहे. एका छोट्याश्या गोष्टीतून एक एक करत सगळं प्रकरण उघडकीस आलं.