कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन सगळे विस्कळीत झाले आहे. तसेच यावर्षी सगळ्या कार्यक्रमांवर कोरोनामुळे परिणाम झाला तसेच स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावरही कोरोना संकटाचा परिणाम दिसून येणार आहे. यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला मर्यादित पाहुण्यांना बोलवण्यात आले आहे. यंदाही लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात अनेक बदल बघायला मिळेल.
सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना ही वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (पीपीई किट) वापर करणे अनिवार्य असेल. तसेच तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना चाचणी करावी लागेल.कार्यक्रमासाठी जे फोटो जर्नलिस्ट सहभागी होणार आहेत त्यांनाही कोरोना चाचणीस सामोरे जावे लागेल.
मागील वर्षी 80 ते 90 फोटोग्राफर्स ना प्रवेश देण्यात आला होता यावर्षी फक्त 10 फोटोग्राफर्स ना प्रवेश मिळणार आहे त्यासाठी गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी झालीये.
तसेच यावर्षी कार्यक्रमाला मर्यादित लोकांची उपस्थिती असणार आहे. 140 पाहुण्यांमध्ये कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ नोकरशाह आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थितीत राहतील. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात कोणत्याही व्हीआयपी व्यक्तिंच्या पती किंवा पत्नीला निमंत्रण देण्यात आलेले नाही. कार्यक्रमावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करता यावे, या उद्देशाने मर्यादित लोकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यक्रमासाठी कार्यरत असनाऱ्या एक अधिकाऱ्याने दिली.
तसेच ,एवढेच नाही तर यंदा भोजन व्यवस्थाही दिसणार नाही. स्वातंत्र्य सैनिकांनाही यंदाच्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेले नाही.