Home राष्ट्रीय पूर्ण भारतात शांततेत निवडणूक होत असताना, ममतांच्या पश्चिम बंगाल मध्येच हिंसाचार का...

पूर्ण भारतात शांततेत निवडणूक होत असताना, ममतांच्या पश्चिम बंगाल मध्येच हिंसाचार का ? कारणे

0

प्राईम नेटवर्क : निवडणूक म्हटलं कि डोळ्या पुढे उभी राहती ती समांतर न्याय व्यवस्था. महाराष्ट्राने आत्तापर्यंत अनेक प्रामाणिक निवडणूक आयुक्त पाहिले, टी एन शेषन सारखे निवडणूक आयुक्त तर थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आपण आव्हान देताना पाहिले. मात्र निवडणूक यंत्रणेला दावणीला बांधणारी काही राज्य आणि नेते सुद्धा अस्तित्वात असल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने समजलंय. पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचा हुकूमशाही चेहरा अनेकदा समोर आलाय.

यामुळे ममता दीदींनी भाजप आणि इतर पक्षांची मुस्कट दाबी केली

भाजपने पश्चिम बंगाल मध्ये २०१४ पासून शिरकाव केल्या नंतर दीदींच्या तळपायाची आग मस्तकात गेलीय. २०१९ नंतर मोदींच्या नेतृत्वात भाजपने यंदा दीदींना तगडं आव्हान दिलंय. यामुळे ममता दीदींनी भाजप आणि इतर पक्षांची मुस्कट दाबी केल्याचं दिसून येतंय. भाजपच्या अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांना त्यांनी प्रचारासाठी पश्चिम बंगाल मध्ये येण्यास मज्जाव केलाय. त्यांना हेलिकॉप्टर लँड करण्यास सुरक्षेच्या कारणास्तव स्पष्ट नकार दिलाय. त्यांच्या सभेत राज्य सरकार वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे आणू पाहत आहेत.

ममतातांनी अवैध बांगलादेशी नागरिकांना आपल्या वोट बँकेसाठी उपयोग करून घेतला

लोकसभा प्रचारा वेळी ममता दीदींच्या तृणमूलने बांग्लादेशच्या एका सुपरस्टार अभिनेत्याला आमंत्रित करण्यात आलं होतं. कारण ममता बॅनर्जींनी अवैध बांगलादेशी नागरिकांना आपल्या वोट बँकेसाठी भारतीय नागरिकत्व प्रदान केलंय. ममता बॅनर्जींच्या आशीर्वादाने अवैध असलेले बांगलादेशी नागरिक आता राजरोज पणे भारतीय नागरिक बनून मतदान करून, भारताचं भवितव्य ठरवत आहेत, पश्चिम बंगाल मध्ये पहिल्या सत्रात काही भाजप प्रभावित मतदान केंद्रावर मतदारांना भीती दाखवण्यासाठी चक्क बॉम्ब स्फोट घडवले गेले. मोदी पश्चिम बंगाल मध्ये जाऊन हिरो बनू नये म्हणून पंप्रधान मोदींचा फेणी वादळात झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करण्यासाठी, मोदींचा फोन घेणं सुद्धा ममता दीदींनी टाळलं. पंतप्रधान मोदींनी राज्याला मदत केल्यास ते त्याचं श्रेय घेतील आणि हिरो बनतील अशी भीती ममता बॅनर्जींना वाटते आहे.

ममता बॅनर्जींनी सीबीआय अधिकार्यांना अटक करवत त्या स्वतः उपोषणाला बसल्या

पश्चिम बंगाल मधील ममता बॅनर्जीच्या मर्जीतील एका पोलीस अधिकाऱ्याच्या शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना ममता बॅनर्जी यांनी अडवलं होतं. या अधिकाऱयांना चौकशी करण्या पासून रोखण्यात आलं होतं, विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते, मात्र याला मोदीच जवाबदार असल्याचं कारण देत ममता बॅनर्जींनी सीबीआय अधिकार्यांना अटक करवत त्या स्वतः उपोषणाला बसल्या होत्या. यावेळी सध्या लोकसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जींच्या हुकूमशाही वृत्तीमुळे त्यांनी संपूर्ण सरकारी यंत्रणा ताब्यात घेतल्याचं दिसतय.

 

पश्चिम बंगाल मध्ये सध्या कशा प्रकारे मतदान होत आहे, हे पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकेल. पश्चिम बंगाल मध्ये सध्या निवडणुकीचे सर्व नियम पायदळी तुडवून नियमांचं सर्रास पणे उल्लंघन केल्याचं दिसतंय. यावेळी पश्चिम बंगाल मधील एक व्हिडिओ व्हायरल झालाय, यामध्ये मतदाराला ईव्हीएम पर्यंत आणून इतर लोक त्यांना कुठे मतदान करायचं हे दाखवताना दिसत आहेत, तर काही जण मतदाराच्या ऐवजी स्वतःच ईव्हीएम वरील आपल्या आवडत्या उमेदवाराला मत देताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींना हुकूमशहा हिटलर म्हणणार्या ममता बॅनर्जी, पंतप्रधान मोदी पुन्हा २०१९ मध्ये सत्तेत आल्यास आणि पश्चिम बंगाल मध्ये भाजपला थोड्या फार प्रमाणात यश मिळाल्यास ममता दीदींचा खरा आणि क्रूर हिटलर शाही चेहरा समोर आल्यास आश्चर्य वाटायला नको.

  • लेखक, राजकीय विश्लेषक : अभिजीत शिंदे