आज देशाची राजधानी दिल्ली येथे रात्री ९ वाजून १० मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले, रिष्टर स्केल वर मोजल्या गेलेल्या भूकंपाची त्रिवता ही ४.६ एवढी होती. नॅशनल सेन्टर फॉर सेसमोलॉजि ने स्पष्ट केले की या भूकंपाचे धक्के गुरुग्राम आणि नोएडा मध्ये सुद्धा जाणवले.
या भूकंपाचे केंद्रस्थान हे रोहतक या ठिकाणी होते.कुठेही जीवितहानी झाली नसल्याची बातमी समोर येत आहे पण अजून शोधाशोध सुरू आहे. दिल्ली मध्ये मागच्या एक महिन्यापासून थोड्याफार अंतराने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.
दिल्लीमध्ये १५ मे ला भूकंप झाला होता, हा सौम्य भूकंप होता तरी त्याची तीव्रता २.२ रिष्टर स्केल एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर दिल्ली मध्ये होता. तसेच १० मे रोजी सुद्धा भूकंप धक्का जाणवला होता तो यावेळी ३.५ रिष्टर स्केल एवढा होता. एप्रिल महिन्यात झालेल्या भूकंपाने सुद्धा दिल्ली हादरली होती वझीराबाद येथे याचा केंद्रबिंदू होता.
एकीकडे कोरोना विषाणूचे थैमान, ते होत नाही तर टोलढादींनी केलेले आक्रमण आणि त्यात आणखी एक भर भूकंपाचे धक्के, चालू वर्ष हे अजून किती नैसर्गिक धक्के पचवायला लावणार आहे हे येणार काळच सांगू शकेल हे नक्की!