Home राष्ट्रीय प्रसिद्ध कलाकार राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन!

प्रसिद्ध कलाकार राहत इंदौरी यांचे कोरोनामुळे निधन!

0

इंदुरमधील लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांनी आज सकाळी त्यांना कोरोना ची लागण झाल्याची माहिती ट्विटर मार्फत दिली होती. तसेच माझ्यासाठी नक्कीच प्रार्थना करा,मी तुम्हाला ट्विटर व फेसबुक द्वारे माहिती देत राहील फक्त एक विनंती आहे की माझ्या घरी याबद्दल काही कळवू नका अशी माहिती त्यांनी दिली होती.

पण हॉस्पिटलमध्ये जाऊन दोन दिवसही नाही झाले आणि त्यांच्या निधनाची बातमी कळाली.

अचानक कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास त्यांनी सोमवारी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची चाचणी केली आणि ती पोसिटीव्ह निघाली.

राहत इंदौरी यांनी केलेला हा शेवटचा ट्विट होता. कोरोनामुळे इंदौरी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.