Home राष्ट्रीय कोरोनापेक्षाही भयानक टोळधाडी! ३० हजार लोकांचं अन्न एकावेळी खाऊन टाकतात, शेतकऱ्यांनो सावधान!

कोरोनापेक्षाही भयानक टोळधाडी! ३० हजार लोकांचं अन्न एकावेळी खाऊन टाकतात, शेतकऱ्यांनो सावधान!

0

अन्न आणि शेतीविषय संस्थेने त्यांच्या बुलेटिन ने असे सांगितले की टोळधाड पथक राजस्थान मध्ये दाखल झाले आहे जे दिवसाला १५० किलोमीटर एवढे अंतर कापते तसेच एका किलोमीटर क्षेत्रातील ३० हजार लोकांचं अन्न खाऊन टाकते.

आत्तापर्यंत आपण कोरोना संक्रमणाला घाबरत होतो पण टोळधाडीचे हे आक्रमण म्हणजे फार भयानक प्रकरण आहे. एकावेळी फक्त एका किलोमीटर मधील ३० हजार लोकांचे अन्न फस्त करू शकणारी ही टोळधाड आपल्या शेतिला पुरती संपवून टाकू शकते. या अगोदर या टोळधाडिंनी आफ्रिका खंड, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान येथील शेतिचे पुरते तीन तेरा वाजवले आहेत. आता ही टोळधाड पाकिस्तान मार्गे भारतात शिरली आहे.

अशा प्रकारच्या टोळधाडींचा हल्ला हा या अगोदर २६ वर्षांपूर्वी झाला होता, राजस्थान महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना यांनी पिछाडून काढले होते. आता मागच्या महिन्यात यांचे आगमन हळूहळू होत होते. फक्त एका महिन्यात राजस्थान च्या शेतीचे तब्बल १००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान संयुक्त राष्ट्र संघाने नुकत्याच त्यांच्या सुचनेमध्ये असे सांगितले आहे की भारताला या वर्षी ह्या टोलढादींच्या सैन्याचा फार मोठा फटका बसणार असून त्यासाठी तयारी करावीच लागेल असे सांगितले आहे.