Home राष्ट्रीय पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे बंधनकारक: विद्यापीठ आयोग, गृह मंत्रालयाची सशर्त परवानगी

पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे बंधनकारक: विद्यापीठ आयोग, गृह मंत्रालयाची सशर्त परवानगी

0

देशातील सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी गृह मंत्रालयाने परवानगी दिली असून ह्या परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचे विद्यापीठ आयोगाने सांगितले आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना लिहिलेल्या पत्रात गृह मंत्रालयाने आज विद्यापीठे आणि संस्थांना परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.” गृहमंत्रालयाने जारी केलेल्या परीपत्रकानुसार अंतिम सत्राच्या परीक्षा ह्या सक्तीच्या असणार आहेत आणि विद्यापीठ आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही परीक्षा घेण्यात येईल. तसेच आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) चेही पालन केले जाईल.

या निर्णयानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य सरकार ज्यांनी या परीक्षा रद्द करण्याचं जाहीर केलं होतं आणि पंतप्रधानांना देखील पत्र पाठवलं होतं. आता या निर्णयानंतर नेमकी राज्य सरकारची भूमिका काय असणार? या परीक्षेबाबत निर्णय राज्य सरकार काय घेणार? हे पाहावं लागणार आहे. मागील काही दिवसांपासून याच मुद्यावरून विद्यार्थांसह पालकही प्रचंड संभ्रमात होते.

परिक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास केले तर सदर विद्यार्थ्यांना कोरोना बँच म्हणुन शिक्का लागेल. तसेच या विद्यार्थ्यांना भविष्यात कोणतीही नोकरी मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गृहमंत्रालयाने विद्यापिठांना परिक्षा घेण्यास परवानगी दिली आहे असे सांगितले जात आहे.