भारताच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा हा शेतीमध्ये गुंतलेला आहे , यामध्ये सुद्धा लघु आणि मध्यम आवाक्यातील शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. आपण जगामध्ये दूध, ताग आणि डाळींचे सर्वात मोठे उत्पादक आहोत.
शेती आणि पशुसंवर्धन यासंदर्भात आज अर्थमंत्र्यांनी ११ घोषणा केल्या आहेत.
(१) रुपये १ लाख करोड रूपये हे शेतीविषयक साठवण करणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होणार आहे. यामध्ये धान्याची गोदामे, शीतगृहे साठवणूक समाविष्ट असतील. याचा फायदा शेतीविषयक संस्था, स्टार्टअप यांना त्यांचा फायदा होणार आहे.
(२) खाद्य उपक्रमांमध्ये १० हजार करोड रुपये विविध योजनांद्वारे गुंतवण्यात येणार आहेत. २ लाख खाद्य उपक्रमांना याचा फायदा होणार आहे.
(३)प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजनेद्वारे २० हजार करोड रुपायांद्वारे नवीन मत्स्य बोटींचा पुरवठा करता येणार आहे, तसेच मासळी व्यापाराचे धक्के बांधता येतील. यामुळे ७० लाख टन माश्यांचे अधिक उत्पादन होईल. यामुळे ५५ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
(४) जनांवरांच्या मृत्यू मध्ये पायाचे आणि तोंडाचे आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. लसीकरण न केलेल्या गायी म्हशीचे किंवा इतर प्राण्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे, गायींना १००% लसीकरण करण्यासाठी १३,३४३ करोड रुपये देणार आहोत यामधून ५३ कोटी जनावरांना लाभ होईल.
(५) दूध संकलन केंद्रांना १५००० करोड रुपये देण्यात येणार आहेत.
(६) वनौषधी उत्पादनासाठी ४००० करोड रुपये देण्यात येणार आहेत. गंगा नदीच्या दोन्ही काठांवर यासाठी विशेष लक्ष देण्यात येईल.
(७) मधमक्षिका पालनासाठी ५०० करोड रुपये देण्यात येणार आहेत.
(८) टमाटे, कांदे, बटाटे यांच्या अविरत वाहतुकीसाठी आणि साठवणुकीसाठी रुपये ५०० करोड रुपये देण्यात येणार आहेत.
(९) जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यामध्ये विशेष बदल करण्यात येणार आहेत.
(१०) शेतकऱ्यांना त्यांना त्यांचा माल हवा त्या किमतीला विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.
(११) शेतमाल उत्पादन किंमत समर्थन उपाययोजना अंमलात येणार असून त्याद्वारे शेतकऱ्याला त्याच्या मालाला किती भाव मिळणार आहे हे आधीच कळू शकेल.