माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी भारतरत्न यांचं निधन झालं आहे. त्यांचं वय ८४ होतं. त्यांची तब्येत खूप दिवसांपासून च खालावलेली होती. बऱ्याच दिवसांपासून दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार चालू होता.
निधनाची बातमी त्यांचा मुलगा अभिजित मुखर्जी याने ट्विट मार्फत दिली आहे. कोरोना चा संसर्ग झाल्याची बातमी त्यांनी स्वतः ट्विट करून सगळ्यांना सांगितली होती त्यांनतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची चाचणी करून त्यांना घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूवर शस्रक्रिया करण्यात आली आणि त्याच रात्री त्यांची तब्येत बरी नव्हती त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं होतं. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘जड अंतकरणाने मी आपणास सांगू इच्छितो की डॉक्टरांनी केलेले अथक प्रयत्न, देशभरातून करण्यात आलेल्या प्रार्थना यानंतरही माझे वडील प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे.’ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून प्रणब मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल ऐकून मन दुखावलं.