लॉकडाऊनमुळे बऱ्याच व्यावसायिकांना, कामगारांना, शेतकऱ्यांना नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत (PKSY) पुढील महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होणार आहेत असे झी 24 तास च्या मीडिया न्यूजवरून समजले.
तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ३ हप्त्यांमध्ये ६००० रुपये देण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव आले आहे अथवा नाही हे तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी १ ऑगस्टनंतर pmkisan.gov. in या संकेतस्थळावर जावे. तेथे फार्मर कॉर्नरवर क्लिक करून बेनिफिशरी स्टेटसवर जावे. त्यानंतर तिथे आधार क्रमांक, अकाउंट नंबर, फोन नंबर अशी सर्व माहिती दिली असेल. ती बरोबर आहे का ते तपासावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केलेला असणे आवश्यक आहे.