स्वातंत्र्य दिनापूर्वीच मोदींनी करदाऱ्यांना भेट दिली आहे. त्याने करदाऱ्यांना भरपूर फायदा होणार आहे.
कर प्रणालीच्या नव्या व्यवस्था आजपासून सुरू करण्यात आली असून Transparent Taxation – Honoring The Honest चा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे.या नवीन प्रणालीमध्ये फेसलेस स्टेटमेंट, फेसलेस अपील आणि टॅक्सपेयर्स चार्टरची सुविधा असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले.
तसेच ,फेसलेस स्टेटमेंट आणि टॅक्सपेयर्सची सुविधा आजपासून सुरु करण्याची माहिती मिळाली आहे. आणि फेसलेस अपीलची सुविधा ही २५ सप्टेंबरपासून चालू होणार आहे. या प्रणालीमध्ये सर्व कामे सुरळीत पार पडणार असून यात सरकारचा हस्तक्षेप कमी होणार आहे. कारदारांची देशाच्या उभारणीसाठी मोठी भूमिका आहे. जेव्हा त्याचे आयुष्य सोपे होते, तेव्हा तो प्रगती करतो, यामुळे देशही प्रगती करू लागतो, असे नरेंद्र मोदी हे ट्विटमार्फत बोलले.