Home राष्ट्रीय खुशखबर! ब्युटी पार्लर आणि सलून सुद्धा उघडणार

खुशखबर! ब्युटी पार्लर आणि सलून सुद्धा उघडणार

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. येत्या ३ मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान काही गोष्टींवर सूटही देण्यात आली आहे. ४ मेपासून सुरु होणाऱ्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या भागात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून उघडण्यास सशर्त परवानगी असेल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केलं. त्याशिवाय, इ-कॉमर्स कंपन्या या क्षेत्रात अत्यावश्यक सामांनांव्यतिरिक्त इतर सर्व वस्तूंची विक्री करु शकतील.ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून उघडण्याची परवानगी असेल. येत्या 4 मेपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून चालक त्यांची दुकानं उघडू शकतील, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिली. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य असेल.

रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. ही नियमवामली फक्त काही मर्यादित क्षेत्रात लागू असेल. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले आहेत. यासाठी दुकानांवर एकमेकांपासून जवळपास सहा फुटांचं अंतर ठेवावं. दुकानावर एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती नको.या नियमांनुसार, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील दुकानं उघडं ठेवता येणार आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात १ मे रोजी एकाच दिवसात १ हजार ८ कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली. या व्यतिरिक्त आज दिवसभरात १०६ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात १ हजार ८७९ रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाच्या एकूण ९ हजार १४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

https://twitter.com/PIB_India/status/1256468081896878080?s=19