Home राष्ट्रीय येस बँकेचे आरोपी वाधवा कुटुंबाला VIP ट्रीटमेंट देणं महागात पडलं, विरोधकांनी सरकारला...

येस बँकेचे आरोपी वाधवा कुटुंबाला VIP ट्रीटमेंट देणं महागात पडलं, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सगळीकडे संचारबंदी असताना वादग्रस्त उद्योगपती वाधवा कुटुंबामधील २३ लोकांना महाबळेश्वर येथे जाण्यासाठी परवानगीचे पत्र दिलेले गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची राज्य सरकारने कारवाई केली
पण ही कारवाई अगदी क्षुल्लक आहे असे बोलले जाते.अशा गंभीर प्रकरणात ‘एआयएस – डी अँड ए’ म्हणजेच ऑल इंडिया सर्व्हिसेस (डिसीप्लिन अँड अपिल) यातील नियम ८ नुसार गुप्ता यांना निलंबित करण्याचे राज्य सरकारला पूर्ण अधिकार असल्याची माहिती मंत्रालयातील एका अती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

सध्या देशामध्ये संचारबंदी सुरू असंताना वाधवा आणि त्यांचे कुटुंबीय ८ एप्रिल रोजी प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांचे पत्र मिळवून महाबळेश्वर येथे सुट्टीसाठी गेले. राज्यात कुणालाही विनाकारण प्रवासाची परवानगी काहिकेल्या मिळत नसताना वाधवा यांच्या कुटुंबातील २३ लोकांना मात्र थेट वरिष्ठ अधिकाऱ्याकडून परवानगी मिळाल्याने राज्यात प्रचंड खळबळ उडाली. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर काल मध्यरात्री राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले.

वाधवा कुटुंबातील २३ लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर येथे जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार, असल्याचे अनिल देशमुख यांनी काल सायंकाळी ट्वीटद्वारे जाहीर केले होते. दुसरीकडे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याची चौकशी करण्याच्या मागणीचे पत्र राज्यपालांना दिले तसेच याविरोधात मुंबई पोलिसात गुन्हा सुद्धा नोंदवला.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात कारवाईची मागणी केली.