Home राष्ट्रीय भारत सरकारकडून चीनमधून एसी व रेफ्रिजरेटर्सच्या आयातीवर बंदी!

भारत सरकारकडून चीनमधून एसी व रेफ्रिजरेटर्सच्या आयातीवर बंदी!

0

भारत व चीनमधील सीमावादामुळे चीनमधील बऱ्याच गोष्टींची आयात तसेच चिनी उत्पादनांचा वापर भारतात दिवसेंदिवस कमी केला जात आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अनेक चिनी ऍप्सवर, कलर टेलिव्हिजन व मोटारसायकलमध्ये लागणाऱ्या न्यूमॅटिक टायर्सच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यानंतर आता चीनमधून भारतात आयात होणाऱ्या एअर कंडिशनर्स व रेफ्रिजरेटर्सवरही सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे असे विदेशी व्यापार महासंचालनालयाने सांगितले. देशांतर्गत उत्पादनाचा खप वाढवणे हेदेखील यामागचे एक कारण असल्याचे मीडिया न्यूजमधून कळते.

या निर्णयामुळे चीनमधील एसी उत्पादक कंपन्यांना मोठा धक्का बसणार आहे. पुढारी वृत्तसंस्थेच्या मीडिया रिपोर्टनुसार भारतातील ४० हजार कोटींच्या एसीच्या बाजारपेठेतील सुमारे २८% माल चीनमधून येतो. तसेच काही कंपन्यांमध्ये एसीचे सुटे भागही चीनमधून आयात केले जातात. या कंपन्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार नसल्याचे विदेशी व्यापार महासंचालनालयाने सांगितले आहे.