शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. नुकतीच केंद्र सरकारने SMAM! किसान योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना शेतीची उपकरणे व शेतमाल खरेदी करण्यासाठी सरकार ८०% अनुदान देणार आहे. त्यानुसार सर्व राज्यांना केंद्र सरकारने ५५३ कोटी रुपये दिले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://agrimachinery.nic.in या संकेतस्थळावर अधिक माहिती पाहता येईल.
आवश्यक कागदपत्रे
ही योजना लागू होण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- पासपोर्ट फोटो
- जमिनीचे अधिकार पत्र
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
- अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी असल्यास जात प्रमाणपत्राची प्रत
अर्ज करण्यासाठी डीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तेथे आपला जिल्हा, उपजिल्हा, गट, गाव ही सर्व माहिती योग्य प्रकारे निवडावी. त्यानंतर जात प्रवर्ग, शेतकरी प्रकार, लिंग या बाबी योग्यरीत्या भराव्यात.