Home राष्ट्रीय शाळा कॉलेजेस उघडण्यासाठी सरकारकडून नवी मार्गदर्शक तत्वे जारी

शाळा कॉलेजेस उघडण्यासाठी सरकारकडून नवी मार्गदर्शक तत्वे जारी

0

कित्येक महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या सर्व गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र काही गोष्टी अजूनही बंदच आहेत. यांबाबत सरकार आता निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यापैकी एक असलेल्या शाळा व कॉलेजेस उघडण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे सरकारने जरी केली आहेत.
मीडिया न्यूजनुसार ही मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे:

१. देशभरातील सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना शैक्षणिक संस्था सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

२. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यास सांगितले आहे.

३. विद्यार्थ्यांना शाळेत/महाविद्यालयात जाण्यासाठी पालकांची लेखी संमती असणे अनिवार्य असून उपस्थितीसाठी शाळा सक्ती करू शकत नाहीत.

४. उच्च शिक्षण संस्था विज्ञान, तांत्रिक, पीजी, पीएचडी अशा प्रात्यक्षिक शिक्षणाची आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उघडण्याची परवानगी आहे.

५. सोशल डिस्टंसिंगच्या सर्व नियमांचे पालन शैक्षणिक संस्थांमध्ये व्हावे व त्यासाठी आसन व्यवस्थेत व इतर आवश्यक बदल या संस्थांनी करावे तसेच मास्क घालणेही सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल.

६. शाळा, महाविद्यालये उघडण्याआधी सर्व भागांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, गेट्सजवळ आवश्यक त्या सुविधा, वेळापत्रक या सर्व गोष्टींची तयारी करावी लागेल.

शाळा व कॉलेजेस व्यतिरिक्त अशाच काही प्रतिबंधांचे पालन करून मेट्रो ट्रेन्स, हॉटेल्स, रेस्टोरंट्स, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, थिएटर्स, धार्मिक स्थळे यांनाही उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.