Home आरोग्य केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिवच निघाले कोरोना पॉसिटीव्ह

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिवच निघाले कोरोना पॉसिटीव्ह

0

देशातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांना तसेच राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांची कोरोना चाचणी पोसिटीव्ह आली असल्याचे मीडिया न्यूजवरून समजले. याबद्दलची माहिती त्यांनी स्वतः ट्विटद्वारे दिली आहे. प्रसारमाध्यमांद्वारे कोरोनाबद्दलची सर्व माहिती व देशातील परिस्थितीची माहिती देणारे लव अग्रवाल हे स्वतःच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “माझी कोरोना चाचणी पोसिटीव्ह आली असून मी विलगिकरणाचे नियम पाळत आहे.” तसेच आपल्या संपर्कात आलेल्या मित्रांना व कर्मचाऱ्यांना देखील कोरोना चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले असून आरोग्य संस्था संपर्कात आलेल्यांची माहिती काढतील असेही सांगितले. मागील ४ महिन्यांपासून कोरोनाची सर्व माहिती प्रसारमाध्यमांमधून पुरवण्याचे काम लव अग्रवाल करत आहेत.