Home आरोग्य कोरोना समोर आपले अपयश? आरोग्य मंत्रालय म्हणाले कोरोना सोबत जगायला शिकून घ्या

कोरोना समोर आपले अपयश? आरोग्य मंत्रालय म्हणाले कोरोना सोबत जगायला शिकून घ्या

0

आज परत एकदा देशामध्ये २४ तासातील रेकॉर्ड ब्रेक रुग्ण आढळले आहेत, केंद्र सरकारने आता ‘कोरोना भरपूर दिवस इथेच राहणार असल्याचे’ संकेत द्यायला सुरू केले आहे.

आज पत्रकारांसोबत बोलताना आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल म्हणाले, “आपण आता लॉकडाउन हळूहळू शिथिल करत आहोत आणि परराज्यातील मजूर सुद्धा त्यांच्या गावी जात आहेत. आपण सर्वांनी आता कोरोना सोबत जगायला शिकून घ्यायला हवे”

देशव्यापी लॉकडाउन जे २५ मार्च पासून लागू करण्यात आले ते पहिल्यांदा ३ मे पर्यंत आणि नंतर १७ मे पर्यंत वाढवण्यात आले मात्र असे करून सुद्धा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव काही कमी होताना दिसत नाही आहे.
गेल्या २४ तासांमध्ये ३३९० रुग्ण आढळले असून देशातील कोरोना रुग्णांची संख्या ५६३४२ एवढी झाली आहे तर १८८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.