Home राष्ट्रीय कसा असू शकतो ३१मे नंतरचा लॉकडाऊन?

कसा असू शकतो ३१मे नंतरचा लॉकडाऊन?

0

कोरोना व्हायरस मूळे फक्त भारतच नाही तर जगभरातील २०० पेक्षा जास्त देश संकटात आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि त्यांनतर टप्या टप्याने वाढवण्यात आला. सध्या देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. देशात रोज सात हजार पेक्षा जास्ती नवीन रुग्ण सापडत आहेत. तर मृतांचा आकडाही वाढतचं आहे. त्यामुळं आता सरकार 31 मेनंतर काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या परिस्थितीवरून काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लॉकडाऊन हटवला जाऊ शकतो, तर इतर शहरात हा कालावधी आणखी २ आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो.

गेल्या 24 तासात 6387 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. सगल दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांच्या संख्येत घट झालेली पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत देशातील लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यात अधिकची सूच मिळण्याची शक्यता आहे.
असा असू शकतो प्लॅन

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, दर 14 दिवसांनी लॉकडाऊनचा आढावा घेतला जाईल. यापुढे केंद्राची भूमिका लॉकडाऊनमधील नियम, कर्जमाफी आणि निर्बंधाबाबत कमी असेल, जास्त अधिकार हे राज्यांना देण्यात येतील. जास्त अधिकार हे राज्यांना देण्यात येतील. गृह मंत्रालय पूर्वीप्रमाणेच राष्ट्रीय पातळीवरील नियमावली जाहीर करेल. यात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे अनिवार्यच राहणार आहे. या शिवाय सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
अशी होती नियमावली.

देशातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने लॉकडाऊन 4.0 बाबत 17 मे रोजी नियमावली जाहीर केली होती. यात कन्टेन्मेंट झोन वगळता इतर सर्व झोनना सूट दिली होती. तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे, शाळा-महाविद्यालये, कोचिंग संस्था, पब-बार, रेस्टॉरंट्स, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळे, जिम, थिएटर, क्लब, मॉल्स इत्यादी बंद ठेवली आहेत. लॉकडाऊन 4 दरम्यान सरकारने 21 मे पासून गाड्या पुन्हा सुरु केल्या आहेत. तसेच 25 मे पासून देशांतर्गत उड्डाणेही सुरु केली आहेत. लवकरच मेट्रो सेवा सुरु करणार असल्याची चर्चा आहे.