Home राष्ट्रीय कसे बनणार अयोध्येतील राम मंदिर? ट्रस्टने ट्विट मार्फत दिली माहिती

कसे बनणार अयोध्येतील राम मंदिर? ट्रस्टने ट्विट मार्फत दिली माहिती

0

अयोध्या: अयोध्येत राम मंदीर बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याच्या उभारणीला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्ट ला मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. तसेच अयोध्या मंदिर आता फक्त तीर्थ नसून अनेकांसाठी ते आता ऐतिहासिक ठिकाण बनणार आहे.

हे मंदिर बांधत असतांना मंदिराच्या २ हजार फूट खाली एक कॅप्सूल ठेवण्यात येणार आहे अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र येथे असलेल्या ट्रस्टमधील सदस्याने ट्विट मार्फत दिला आहे.

राम मंदिराचे बांधकाम सुरू असताना मंदिराच्या दोन हजार फूट खाली कॅप्सूल ठेवण्यात येणार आहे अशी माहिती कामेश्वर चौपाल यांनी दिली आहे. भविष्यात पुढच्या पिढीला राममंदिराचा अभ्यास करायचा असल्यास त्या कॅप्सूल मार्फत त्यांना संपूर्ण अभ्यास करणे शक्य होईल अशी माहिती देण्यात आली आहे.