Home राजकीय काँग्रेस, आणि आपची युती ? भाजपला हरवायला कुठल्याही थराला जाईल : केजरीवाल

काँग्रेस, आणि आपची युती ? भाजपला हरवायला कुठल्याही थराला जाईल : केजरीवाल

0

प्राईम नेटवर्क : २०१४ साली काँग्रेसला सत्तेतून घालवायला काहीही करायला तयार असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चक्क, काँग्रेस बरोबर पुन्हा एकदा युती करण्यासाठी तयार झालेत. दिल्ली मध्ये झालेल्या सभेत, अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा यु टर्न घेत काँग्रेस सोबत आम्हाला हात मिळवणी करावी लागली तरी चालेल, सर्व जागा आम्ही काँग्रेसला देऊ, पण आम्ही भाजपला लोकसभेत हरवू, असं विधान केलं होतं.

राहुल गांधी यांनी दिल्ली काँग्रेसची तात्काळ बैठक बोलावली

आज सकाळी ११ च्या सुमारास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्ली काँग्रेसची तात्काळ बैठक बोलावली आहे. आम आदमी पार्टीला महा गठबंधन मध्ये सहभागी करून घ्यायचं का, या साठी विचार मंथन या बैठकीत होणार होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना हरवण्यासाठी विरोधक मतभेद विसरून, ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ एकत्र होऊ लागले आहेत.