Home राष्ट्रीय हिंदी बोलता येत नाही तर भारताचे नागरिक आहात का? सिआयएफच्या अधिकाऱ्याने केली...

हिंदी बोलता येत नाही तर भारताचे नागरिक आहात का? सिआयएफच्या अधिकाऱ्याने केली विचारपूस!

0

तामिळनाडू मधील मुन्नेत्र कळघमच्या खासदार कनिमोळी दिल्लीला जाण्यासाठी चेन्नई विमानतळावर गेल्या असतांना त्यांना विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) अधिकाऱ्याने ,’तुम्ही भारतीय आहात का?’ असा प्रश्‍न विचारला असा आरोप कनिमोळी यांनी केला आहे. हा सगळा प्रकार त्यांनी ट्विटद्वारे सांगितला आहे.

कनिमोळी ह्या hindiimposition या हॅशटॅगद्वारे ट्विट करतांना बोलल्या की ‘भारतीय म्हणजे हिंदी यायलाच पाहिजे असे कधीपासून झाले याची मला माहिती हवी आहे’.या घटनेनंतर ‘सीआयएसएफ’ने ट्विट करत घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली.

सीआयएफने ट्विट मध्ये म्हटलं की एखादी भाषा ही कोणालाही व्यवहारासाठी किंवा बोलण्यासाठी वापरण्यासाठी आग्रह करू नये हे सिआयएफच्या तत्वात बसत नाही याबद्दल त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच कनिमोळी यांनी सिआयएफचे आभार सुद्धा मानले.