महाराष्ट्रात जसे महाविकास आघाडीने शिवभोजन योजना सुरु केली आहे. तशीच आता राजस्थान सरकारने नवीन योजना आणली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्यातील कोणाताही व्यक्ती भुकेला राहू नये यासाठी २० ऑगस्टपासून राजस्थानात इंदिरा रसोई योजना सुरु करण्यात येत आहे.
या थाळीची किंमत प्रति थाळी ८ रुपये इतकी असणार आहे तसेच राज्य सरकार या योजनेसाठी १२ रुपये प्रतिथाळी अनुदान देणार आहे. या थाळीमध्ये डाळ, चपाती, भाजी आणि लोणचं हे पदार्थ असणार आहेत.
या योजनेचा दिवसाचा खर्च १.३४ लाख इतका असून वर्षाला ४ कोटी ८७ लोकांना भोजन देण्याचा सरकारचा इरादा आहे. राज्यातील २१३ शहरातील ३५८ किचनमार्फत ही सेवा पुरविण्यात येणार आहे.