देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनलॉक 2 ची घोषणा केली आहे. कोरोना विषाणूशी मुकाबला करत आपण आता अनलॉक 2 पर्यंत पोहोचलो आहोत, आता पावसाळा आला असून यामध्ये विशेष काळजी घ्यायला हवी.
पंतप्रधान यांनी आज संध्याकाळी ४ वाजता व्हिडिओच्या माध्यमातून देशाला संबोधन दिले, “आज भारताची परिस्थिती बाकी देशांपेक्षा खूप चांगली असून आपण वेळेवर केलेल्या उपाययोजना आणि त्यांची अंमलबजावणी मुळे सर्व शक्य झाले आहे. अनलॉक च्या पहिल्या टप्प्यात अनेक ठिकाणी नियमांचे पालन न झाल्याचे समोर आले हे कदापि चालणार नसून आपण सर्व नियमांचे पालन करायलाच हवे” असे आवाहन त्यांनी केले.
“कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी पुढील काही महिने खूप महत्वाचे असून यामध्ये पावसाळा ऋतू उभा ठाकला आहे, पावसाळ्यामध्ये ऋतुचक्रातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप यांच्यासारख्या साथी ह्या येणार आहेत ही लक्षणे कोरोणाची सुद्धा असल्यामुळे एकंदर कोरोना रुग्णांना ओळखणे अवघड होऊन बसणारे आहे. यामुळे आपण स्वतःला निरोगी कसे ठेवता येईल यासाठी पूर्ण प्रयत्न करायला हवे. काही लोकांनी मास्क चा वापर पूर्णपणे सोडून दिला आहे, हात धुण्याची सवय सुद्धा धाब्यावर बसवण्यात येत आहे, असे करणे आजाराला निमंत्रण ठरणार असून या नियमांचे पालन करायलाच हवे” असे पंतप्रधान म्हणाले