Home आरोग्य “भारतामध्ये व्हेंटिलेटर, मास्क इत्यादीचा तुटवडा आहे वारंवार सांगून सुद्धा निर्यात का सुरु...

“भारतामध्ये व्हेंटिलेटर, मास्क इत्यादीचा तुटवडा आहे वारंवार सांगून सुद्धा निर्यात का सुरु ठेवली, हे फार मोठे कट कारस्थान”- राहूल गांधी

0

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्कसारखी पुरेसी जीवरक्षक उपकरणं आपल्यासाठी राखून का ठेवली नाहीत? सध्या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्स बिना जीवनरक्षक उपकरणाचे लढत आहेत” असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला.

तसेच हा फार मोठा गुन्हेगारी कट तर नाही ना असा संशयही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. WHO ने सल्ला देऊनही या वस्तूंच्या निर्यातीला परवानगी देणे हा देशवासियांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे.WHO ने तीन आठवड्यापूर्वीच व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्कचा पुरेसा साठा करुन ठेवण्याच्या सूचना केलेल्या असताना सुदधा तीन आठवड्यांनंतर केंद्र सरकारने या उपकरणांच्या निर्यातीवर बंदी घातली.

“जनतेच्या जीवाशी केलेला हा खेळ कोणत्या ताकदीच्या जोरावर करण्यात आला. हा गुन्हेगारी कट नाही का? असं राहुल गांधी म्हणाले.दरम्यान, ‘जेव्हा मोदींनी जनता कर्फ्युची घोषणा केली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने मास्कच्या निर्यातीवर १९ मार्च रोजी बंदी घातली होती हे फार आधी व्हायला हवे होते,”असं राहुल गांधी म्हणाले.