Home राष्ट्रीय भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात; वैमानिक सुखरूप!

भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात; वैमानिक सुखरूप!

0

आज अर्थात सोमवारी सकाळी ११.१५ च्या सुमारास भारतीय लष्कराचे ‘चीता’ हे हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान कोसळलं अशी माहिती मिळत आहे. सुदैवाने या हेलिकॉप्टरचे दोन्ही पायलट सुखरूप असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील माहोर या गावात हे हेलिकॉप्टर कोसळले असल्याचे समोर आली आहे.

उधमपूर येथून उड्डाण केल्यानंतर काही तासांनी हे हेलिकॉप्टर माहोर येथे असतांना अचानक कोसळले. यात जीवितहानी झाली नसून लोकमतच्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा चीता हेलिकॉप्टर कोसळले होते तेव्हा दोन्ही पायलट्स मृत्युमुखी पडले होते. पूर्व भूतान येथे घडलेल्या या अपघातात भारतीय सैन्यातील लेफ्टनंट कर्नल रजनीश परमार आणि कॅप्टन कालझँग वांगडी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज घडलेल्या दुर्घटनेविषयी लष्करात तसेच पायलट्सची चौकशी केली जात असून अपघाताचे कारण लवकरच समोर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.