Home राष्ट्रीय काल घरात घुसून मारलं, आज तोंड फोडलं, घुसखोर पाकिस्तानी विमानाला भारताने पाडलं

काल घरात घुसून मारलं, आज तोंड फोडलं, घुसखोर पाकिस्तानी विमानाला भारताने पाडलं

0

प्राईम नेटवर्क : भारताने काल पाकिस्तानला घरात घुसून मारलं, तर आज पाकिस्तानचं तोंड फोडलं आहे, भारताने पाकिस्तानच्या बालाकोट इथं केलेल्या एअरस्ट्राईक मुळे बिथरलेला पाकिस्तान दबावाला बळी पडून, काश्मीरच्या पुंच आणि राजौरी परिसरात बॉम्ब टाकल्याची माहिती, पीटीआय या वृत्त संस्थेने दिली आहे, पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी सकाळी १०:४५ दरम्यान भारताच्या नौशेरा सेक्टरमध्ये हवाई हद्दीत घुसखोरी केली, घुसखोरी करून परतत असताना, त्यांनी या परिसरात बॉम्ब टाकून हि विमाने पसार झाली आहेत, या विमांना भारतीय वायू दलाने हाकलून लावले. यावेळी हि विमाने जवळ पास ३ किलोमीटर आत मध्ये आलं होतं.

स्थानिकांनी या विमानाला पडताना पाहिलं

या विमानांना हाकलून लावत असताना भारताने पाकिस्तानचं एफ १६ हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पाडण्यात यश मिळवलं आहे. यावेळी पाकिस्तानच्या हद्दीत पडलेल्या विमानाच्या वैमानिकाचं काय झालं, हे मात्र कळू शकलं नाही. मात्र स्थानिकांनी या विमानाला पडताना पाहिलं आहे. यावेळी या विमानाचं मोठं नुकसान झालं आहे, पाकिस्तानने भारतावर आज पुन्हा आगळीक केल्यावर, भारताने तोडीस तोड चोख उत्तर दिल्यावर पाकिस्तान पुन्हा बिथरलाय. पाकिस्तानचा प्रत्येक डाव त्यांच्या वरच उलटतोय.

या परिस्थिमुळे पाकिस्तान आणि येथील सरकारवर प्रचंड दबाव

सध्या या परिस्थिमुळे पाकिस्तान आणि येथील सरकारवर प्रचंड दबाव आला आहे, कालच येथील संसदेत पाकिस्तान सरकार विरोधात शेम शेम अशा घोषणा दिल्या गेल्या. यामुळे या अपमानाने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानवर सध्या भारतावर प्रत्युत्तराचा दबाव वाढत चाललाय.

एअरस्ट्राईक नंतर पुन्हा एकदा तिन्ही दले सज्ज

दरम्यान, एअरस्ट्राईक मुळे बिथरलेल्या पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारत सक्षम असून सर्वत्र सीमा रेषेवर हायअलर्ट जारी केला गेला आहे, एअरस्ट्राईक नंतर पुन्हा एकदा तिन्ही दले सज्ज झाली आहेत.

भारताने सध्या पाकिस्तानची चहू बाजूंनी नाकेबंदी केली आहे

अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला दम दिला असून पाकिस्तान मधील दहशतवादी तळांवर कारवाई करा असं ठणकावलं आहे, यात ऑस्ट्रेलियाने सुद्धा भारताची बाजू घेतली आहे, तर फ्रांस ने आपण भरता सोबत असल्याची कल्पना देत, भारत जी कारवाई करेल, त्याचं आम्ही समर्थन करतो असं म्हटलं आहे, तर चीनने दहशतवादी मसूद अझर वर बंदी टाकण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे.

भारताने सध्या पाकिस्तानची चहू बाजूंनी नाकेबंदी केली आहे, भारताने आयात निर्यात बंद केल्या नंतर खेळ, मनोरंजन, आंतरराष्ट्रीय व्यापार अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर पाकिस्तानवर मात केली आहे.