Home राजकीय दिल्लीची परिस्थिती काबूत आणण्यासाठी आता सज्ज भारतीय जेम्स बाँड (अजित डोवाल)

दिल्लीची परिस्थिती काबूत आणण्यासाठी आता सज्ज भारतीय जेम्स बाँड (अजित डोवाल)

0

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार संबंधी घटनांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विविध भागांत जाऊन परिस्तिथीचा आढावा घेतला. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) दिल्लीत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी NSA कडे देण्यात आली आहे. दिल्लीत काय परिस्थिती आहे याची माहिती डोवाल पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाला देणार आहेत. मंगळवारी रात्री डोवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी आणि भजनपुरा येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला.


“कायद्याचे पालन करणाऱ्या कोणाचेही नुकसान होणार नाही. शहरात पुरेसे सैन्यबल तैनात केले आहे, कोणालाही घाबरण्याची गरज नाही. लोकांना सुरक्ष दलावर विश्वास ठेवावा लागेल.” असे अजित डोवाल म्हणाले. 
अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. सैन्याकडून देण्यात येणार्‍या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलिस अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते. त्यांनी राष्ट्रीय तपास योजनेच्या कार्यांत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना भारतीय जेम्स बॉण्ड असे बोलले जाते.