रेल्वे क्षेत्रात अगदी सुरवातीपासून असलेली सरकारची एकहाती मालकी सरकार संपवण्याच्या प्रयत्नात आहे, रेल्वे मंत्रालयाने देशभरात १५० रेल्वेगाड्या खासगी कंपन्यांना चालवण्याचे कंत्राट देण्यासाठी जाहिरात दिली आहे.
रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून सांगितले की, “खासगीकरणाच्या माध्यमातून रेल्वेला तीस हजार करोड रुपये उभारण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेगाड्या इतिहासात पहिल्यांदा खासगीकरणाच्या माध्यमातून पॅसेंजर रेल्वे गाड्या चालवणार आहे”
खासगीकरण केलेल्या १५० रेल्वेगाड्या आणि त्यांच्या तिकिटांचा दर हे कंत्राट मिळालेल्या कंपन्याचं करणार असून ह्यामध्ये वेगळे तंत्रज्ञान वापरण्याची त्यांना पूर्ण मुभा असणार आहे. सरकारने घेतलेल्या ह्या निर्णयाने रेल्वे क्षेत्रातील कामगारांवर कसे परिणाम होतील यावर सद्या देशात चर्चा सुरू आहे.
रेल्वे मंत्रालयाने सांगितले की हा खासगीकरण करण्याच्या निर्णय हा इथून पुढे रेल्वेगाड्या भारतामध्येचं कशा निर्माण केल्या जातील यासाठी महत्वाचे पाऊल असणार असून, यामुळे देशात नवीन रोलिंग स्टॉक नावाचे तंत्रज्ञान विकसित होणार आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे रोजगार निर्मिती होणार असून, सुरक्षितता वाढीस लागून, जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याची रेल्वेची क्षमता वाढणार आहे.