प्राईम नेटवर्क : भारताने पाकिस्तानला धडकी भरवणारा निर्णय घेतलाय, भारत पाकिस्तानवर पुढील काळात मोठी कारवाई करू शकतो, कारण आज २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सुमारे २७०० कोटी रुपयां पर्यंतची शस्त्र खरेदी करण्यासाठीचा प्रस्ताव पारित केला आहे. या शस्त्र खरेदीत तब्बल दोन पाणबुड्यांचा देखील समावेश असणार आहे, भारताच्या या निर्णयाने पाकिस्तानच्या उरात मात्र धडकी भरणार आहे.
कंगाल झालेल्या पाकिस्तानची युद्ध करण्याची तयारी नाही
कंगाल झालेल्या पाकिस्तानची युद्ध करण्याची सध्या बिलकुल तयारी नाही, किंवा त्यांना युद्ध परवडणार देखील नाही. एका बाजूने आर्थिक कोंडी आणि दुसऱ्या बाजूने युद्ध हे पाकिस्तानच्या विनाशाच्या कारण ठरू शकेल, त्यामुळे पाकिस्तान भारता सोबत युद्ध करणं पाकिस्तानला सामरिक दृष्ट्या परवडणारं नाही.
पंतप्रधान मोदींची बोल्ड पावले, पाकिस्तानला धास्ती
भारताच्या २७०० कोटी शस्त्र खरेदीच्या निर्णयामुळे चीन सुद्धा बिचकू शकतो, मात्र भारताच्या या अचानक घेतलेल्या पवित्र्यामुळे पाकिस्तानची दैना होणार, या सोबत पंतप्रधान मोदींची बोल्ड पावले सध्या पाकिस्तानला धास्ती घेण्यास भाग पाडत आहेत.