Home राष्ट्रीय “भारताच्या विकासाचा रस्ता पाकिस्तानातून जातो” शोएब अख्तरचे वादग्रस्त वक्तव्य

“भारताच्या विकासाचा रस्ता पाकिस्तानातून जातो” शोएब अख्तरचे वादग्रस्त वक्तव्य

0

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याने भारताबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार “भारताच्या विकासाचा रस्ता पाकिस्तान मधून जातो”, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शोएब हा अनेक भारतीय क्रीडा वाहिन्यांवर विश्लेषक आणि समालोचक म्हणून काम करत होता. आता सध्या दोन्ही देशांमध्ये दहशतवादाच्या मुद्द्यावर क्रिकेट खेळवलंच जात नाहीये. एका पाकिस्तानी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताना शोएबने भारत-पाक संबंधांवर आपलं मत मांडलं आहे.

त्याला भारत पाकिस्तान संबंधित विचारले असता त्याने, “भारत एक चांगला देश आहे, तिकडची लोकंही चांगली आहेत. तिकडच्या लोकांना पाकिस्तानसोबत युद्ध हवे आहे , असे मला अजिबात वाटत नाही. पण जेव्हा मी भारतीय वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहतो, त्यावेळी मला असं वाटू लागतं की उद्यापासून दोन्ही देशांत युद्ध होणार आहे.” तसेच तो पुढे म्हणाला की, “मी अनेकदा भारतात गेलोय, मी खात्रीने सांगू शकतो की पाकिस्तानबरोबर काम करण्यासाठी भारतीय लोकं खुपच उतावळे आहेत आणि पाहायला गेले तर भारताच्या विकासाचा रस्ता पाकिस्तानातूनच जातो.”

पुढे कोरोना बद्दल त्याला विचारले असता त्याने त्यासाठी चीनला जबाबदार धरले. तो म्हणाला, “ते लोक कुत्रे, मांजरे, वटवाघळे कसे काय खाऊ शकतात? असल्या विचित्र खाण्यापिण्यामुळे कोरोना सारखे रोग होणारच.”