राष्ट्रीय तपास संस्थेनं शनिवारी अनेक ठिकाणी छापे टाकले त्यामध्ये त्यांनी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये केलेल्या या कारवाईत 9 दहशतवाद्यांना अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम इथं छापा टाकला आहे. हे दहशतवादी अल या संघटनेचे होते अशी माहीती ANI ने दिली आहे.
प्राथमिक तपासात अटक करण्यात आलेले अतिरेक्यांनी सोशल मीडियावर कट्टरपंथी भूमिका मांडली होती. तसेच त्यांनी दिल्लीसह भारतात अनेक हल्ले घडवून आणण्यासातही चिथावणीखोर पोस्ट सोशल मीडियावर केल्याचं समोर आलं असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेनं म्हटलं आहे.
या दहशतवाद्यांकडे डिजिटल उपकरणं, कागदपत्रं, जिहादी साहित्य, धारदार शस्त्रे आणि देशी शस्त्रांसह घरीच स्फोटके तयार करण्याशी संबंधित कागदपत्रे आढळली आहे. तसंच मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह साहित्यसुद्धा एनआयएने जप्त केलं आहे. अल-कायदाच्या मॉड्युलची माहिती मिळाल्यानंतर एनआयएनं छापासत्र सुरू केलं. यामध्ये मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने दहशतवाद्यांकडून कट रचला जात होता अशी माहिती एनआयएने दिली आहे.