जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनमध्ये कायमच नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. अमेझॉनमध्ये नोकरी करणारे कित्येक लोक कमी वेळात जास्त पैसे कमावतात. आतादेखील नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अमेझॉनमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून पार्ट टाईम व फुल टाईम जॉबची संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षण घेत असलेले विद्यार्थी देखील पार्ट टाईम डिलिव्हरी बॉयचे काम करूम पैसे मिळवू शकतात.
अर्ज प्रक्रिया
अमेझॉन डिलिव्हरी बॉय सकाळी ७ पासून रात्री ८ या वेळेत काम करतात. जवळपास १००- १५० पॅकेजेस ते ४ तासांत पोहचवतात. डिलिव्हरी बॉयचे काम मिळवण्यासाठी इच्छूक उमेदवार https://logolog.amazon.in/applynow या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. तसेच अमेझॉनला इमेल करूनही डिलिव्हरी बॉयसाठी नोंदणी करता येऊ शकते. याशिवाय अमेझॉनच्या स्थानिक केंद्रांमध्येही डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी अर्ज करता येऊ शकतो.
आवश्यक कागदपत्रे
डिलिव्हरी बॉयच्या नोकरीसाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांकडे शाळा अथवा कॉलेजमधून पास असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच डिलिव्हरीसाठी विमा नोंदणी क्रमांक असलेली स्वतःची दुचाकी गाडी किंवा स्कुटर असणेही अनिवार्य आहे.
किती कमावू शकता?
अमेझॉनकडून डिलिव्हरी बॉयला दर महिन्याचा पगार मिळतो. या पगारात पेट्रोलचा खर्च समाविष्ट नसतो. एका पॅकेजच्या डिलीव्हरीसाठी डिलिव्हरी बॉयला १५-२० रुपये मिळतात. यानुसार दिवसाला १०० पॅकेजेस पोहचवले तर दिवसाचे जवळपास २००० रुपये मिळू शकतात. यानुसार महिन्याला तब्बल ६० हजारांपर्यंत कमाई होऊ शकते.