भारतातील नावाजलेली राष्ट्रीयकृत बँक SBI अर्थात भारतीय स्टेट बँकने तब्बल ३८५० जागांसाठी भरती होणार असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये महाराष्ट्र विभागासाठी ५१३ पदांची भरती होणार असून भरतीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून १६ ऑगस्ट २०२० ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे असे मीडिया न्यूजवरून समजले.
पदाचा सविस्तर तपशील:
पद : अधिकारी
रिक्त पद संख्या : ३,८५०
पात्रता : कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी
वयोमर्यादा : ३० पेक्षा अधिक नसावे
नोंदणी शुल्क : Open & OBC – ७५०/- ; SC/ST/PWD – 0 (फी नाही)
या शैक्षणिक पात्रतेशिवाय अर्जदाराला कुठल्याही व्यावसायिक किंवा ग्रामीण प्रादेशिक बँकेत अधिकारी पदावर काम केल्याचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून ‘करियर’ या सेक्शनमध्ये असलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म मार्फत नोंदणी करू शकतात. हा फॉर्म भरण्याची मुदत १६ ऑगस्ट २०२० पर्यंत असून फॉर्मची प्रिंट काढण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत आहे.