Home राजकीय सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या बोलण्यावर केली कंगना राणावतने टीका..

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या बोलण्यावर केली कंगना राणावतने टीका..

0

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास चालू असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलले की आमच्या कुटुंबावर सुशांत सिंह प्रकरणावरून चिखलफेक करत आहेत. तरीही मी या प्रश्नी संयमानेच राहतोय. हे गलिच्छ राजकारण आहे असे ते बोलले. मात्र, त्यांच्या बोलण्यावर कंगना रौनावत ने टीका केली आहे.

कंगना रौनावत बोलल्या की घाणेरड्या राजकारणाविषयी कोण बोलताय बघा. आधी तुम्ही तुमचे वडील कसे मुख्यमंत्री झाले ते बघा हे घाणेरडं राजकारण आहे. ते सगळं सोडा आणि आधी तुमच्या वडिलांना या केस विषयी काही प्रश्न विचारा. त्यांनी ट्विट मार्फत सात प्रश्न विचारले आहेत.

‘हे’ आहेत ते सात प्रश्र्न

1) रिहा चक्रवर्ती कुठे आहे?

2) सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूबाबत मुंबई पोलिसांनी एफआयआर का घेतली नाही?

3) सुशांतच्या जीवाला धोका असल्याची तक्रार फेब्रुवारीमध्ये दाखल केल्यानंतरही मुंबई पोलीस पहिल्या दिवशीच ही आत्महत्या आहे, हे कसं म्हणत होते?

4) आपल्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट का नाहीत? सुशांतचा खून झाला त्या आठवड्यात तो फोनवर कोणाशी बोलला याचा डेटा का नाही?

5) आयपीएस विनय तिवारी यांना क्वारंटाईनच्या नावावर बंदिस्त का ठेवण्यात आलं?

6) सीबीआय चौकशी बाबत एवढी भिती का ?

7) रिहा आणि तिVच्या कुटुंबाने सुशांतचे पैसे का लुटले?

या प्रश्नांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायला हवीत अशी मागणी केली आहे.