Home राजकीय औवेसींच्या नागरिकत्व कायद्याविरोधी कार्यक्रमात “पाकिस्तान जिंदाबाद” चे नारे!

औवेसींच्या नागरिकत्व कायद्याविरोधी कार्यक्रमात “पाकिस्तान जिंदाबाद” चे नारे!

0

बेंगळुरू येथील नागरिकत्व कायद्याविरोधी कार्यक्रमात अमूल्य नावाच्या महिलेने स्टेजवर जाऊन चक्क ‘पाकिस्तान जिंदाबाद’ चे नारे लगावले. यावेळी एमआयएम चे नेते असदुद्दीन औवेसी स्टेजवर उपस्थित होते. या घोषणा देत असतांना औवेसी यांनी त्या महिलेला आवरले व अशा सूचना देणे चुकीचे आहे असे सुनावले! तर त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफीसुद्धा मागितली.

मिळालेल्या माहितीनुसार “संविधान बचाओ” या कार्यक्रमामध्ये औवेसी यांच्या भाषणानंतर कार्यक्रमाच्या संयोजकांनी अमूल्य या महिलेला भाषणासाठी बोलविले असता या महिलेने मंचावर जाताच संपूर्ण प्रेक्षकांना तिच्यासोबत “पाकिस्तान जिंदाबाद” चे नारे देण्याचे आवाहन केले. हे ऐकताच औवेसी यांनी धाव घेत महिलेला आवरण्याचा प्रयत्न केला. पण या आढमूठ महिलेने घोषणा देणे सुरूच ठेवले. त्यामुळे पोलिसांनी त्या महिलेला मंचावरून खाली उतरवले! औवेसी झाल्या प्रकाराबद्दल बोलत असतांना म्हणाले की त्या महिलेशी त्यांचा काही एक संबंध नाही आणि आम्ही तिच्याशी संपूर्ण असहमत आहोत. संयोजकांनी त्या महिलेस आमंत्रित करायला नको होते तर पोलिसांनी त्या महिलेची कसून चौकशी करावी असे आवाहन सुद्धा त्यांनी पोलिसांना केले

झालेल्या प्रकाराचा प्रत्यक्ष व्हिडिओ ANI ने ट्विटरवर पोस्ट केला आहे.