Home तंत्रज्ञान विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी उरले शेवटचे ५ दिवस..

विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी उरले शेवटचे ५ दिवस..

0

भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-2 योजनेवर केवळ भारताच्याच नाही तर साऱ्या जगाच्या आशा लागून होत्या. विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी आता इस्रोकडे फक्त शेवटचे ५ दिवस राहिले आहेत. विक्रम लँडरला चंद्रावरील एक दिवस अर्थात पृथ्वीवरील १४ दिवसांसाठी कामगिरी बजावण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. आता ही कामगिरी फत्ते करण्यासाठी इस्रोकडे केवळ ५ दिवस उरले आहे.

न्यूज रिपोरनुसार विक्रम ७ सप्टेंबरला चंद्रावर उतरणार होतं. मात्र ते उलट्या भागावर उतरल्याने संपर्क साधने कठीण झालं आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासानेही विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. परंतु मातीमध्ये अँटेना अडकल्याने हे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. जोवर विक्रम लँडरवर सूर्याचा प्रकाश आहे तोवरच त्याच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो. त्यानंतर अर्थात आजपासून पाच दिवसानंतर विक्रम लँडरशी संपर्क साधला जाईल की नाही याची खात्री नाही.