Home राष्ट्रीय १८ मे आधी Lockdown 4.0 ची घोषणा करणार: नरेंद्र मोदी

१८ मे आधी Lockdown 4.0 ची घोषणा करणार: नरेंद्र मोदी

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस संबंधी आज देशाला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले, ” कोरोना व्हायरस विरोधी लढाई च्या निमित्ताने भारताला एक संधी मिळाली असून त्यातून आपल्याला एक संदेश मिळत आहे. आत्मनिर्भर भारताने या आपत्तीचा सुद्धा उपयोग केला पाहिजे. लॉकडाउन ४ हा आता आधीच्या पेक्षा फार वेगळा असणार आहे तसेच तो कसा असेल यासंबंधी माहिती मी १८ तारखे आधी सांगेल”.

या भाषणादरम्यान मोदींजिंकडून आर्थिक पॅकेजची सुद्धा घोषणा करण्यात आली, हा आर्थिक पॅकेज हा जवळजवळ २० लाख करोड एवढा असणार असून GDP च्या १०% तो असणार आहे. “हा पॅकेज आपल्या देशातील त्या शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांसाठी आहे जे दिवसरात्र या देशातल्या प्रत्येकासाठी कष्ट करत आहेत. हा पॅकेज देशातील त्या मध्यमवर्गीयांसाठी आहे जे लोक आपला कर नेहमी न चुकता भरतात”, असे पंतप्रधान म्हणाले.

आपल्या भाषणादरम्यान कोरोना नंतर चा भारताच्या आत्मनिर्भर तेचे ५ आधारस्तंभ कसे असतील या संबंधी पुढील प्रमाणे सांगितले,

(१) अर्थव्यवस्था
(२) बांधकाम जे देशाचा कणा बनेल
(३) व्यवस्था जी २१ व्या शतकातील तंत्रज्ञानावर आधारलेली आहे
(४) आपली लोकसंख्या जी देशाची शक्ती आहे
(५) अर्थव्यवस्थेतील मागणी आणि पुरवठा

“आत्मनिर्भर भारताचे सर्वात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बघायचे झाल्यास, लॉकडाउन आधी
भारतामध्ये एकही PPE किट बनवण्यात येत नसे तसेच N95 मास्क सुद्धा बनवणारे फार थोडे लोक होते. पण आता मात्र आपण २ लाख PPE आणि २ लाख N95 बनवत आहोत, हे सारे शक्य झाले कारण आपण संकटातून चालून आलेल्या संधीचे सोने केले आहे.”