Home राष्ट्रीय १४ तारखेला लॉकडाउन उठवणे अजिबात परवडण्यासारखे नाही, शनिवारी घेणार पुढचा निर्णय :...

१४ तारखेला लॉकडाउन उठवणे अजिबात परवडण्यासारखे नाही, शनिवारी घेणार पुढचा निर्णय : नरेंद्र मोदी

0


देशातील कोरोना व्हायरसचा संपूर्ण नष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, देशातील सर्व भागांमध्ये लॉकडाऊन उठविणे शक्य होणार नाही.त्यामुळे लॉकडाऊन संदर्भांत पुढील मोठा निर्णय शनिवारी (ता. ११) रोजी पंतप्रधान घेणार आहेत.

मोदींनी कोरोना व्हायरसच्या परिस्थितीबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक घेतली. देशव्यापी लॉकडाउन सुरू व्हायच्या आधीही अशी बैठक झाली होती. देशातील २१ दिवसांचा लॉकडाऊनचा काळ संपत आला असताना शनिवारी (ता. ११) पुन्हा एकदा राज्यांच्या परिस्थितीचा अंदाज घेणार आहेत. यानंतर लॉकडाऊन संदर्भात पुढील निर्णय घेणार आहेत.

पंतप्रधानांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज (बुधवार) सर्वपक्षीय बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतली. बैठकीवेळी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले. लॉकडाऊननंतरही देशामधील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या परिस्थितीत लॉकडाऊन सरसकट उठवणे हे अजिबात परवडण्यासारखे नाही, असे पंतप्रधान म्हणाले. राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत शनिवारी पुन्हा एकदा चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्याचे आवाहन केले आहे. सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्याचे आवाहन केले जात आहे.