मनी कन्ट्रोल या वृत्तपत्रानेे प्रकाशित केल्याप्रमाणे एका अमेरिकी कंपनीच्या अभ्यास निष्कर्ष अहवालात भारतातील लॉकडाउन हे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतरच काढता येईल असे म्हटले आहे.
लॉकडाउन उठवण्याला होणारा उशीर हा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे, भारतातील आरोग्य सेवेच्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी कितीपत तत्पर असतील आणि करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि त्यांची अंमलबजावणी या गोष्टी फार महत्वाच्या ठरणार आहेत. बोस्टन कन्सल्टंट ग्रूप (BCG) हा अमेरिकन गट असून त्यांनी हा अवहाल समोर आणला आहे.यांच्या म्हणण्यानुसार जुलै च्या शेवटच्या आठवड्यात कोरोना ची संख्या शिखर गाठेल असे सुद्धा म्हटले आहे.
BCG या संस्थेने सांगितल्याप्रमाणे “आम्ही जगभरातील उद्योगात येणाऱ्या अडचणी आणि चढउतारांवर भाष्य करत असतो.” भारतातील उद्योगसमूहांवर करण्यात आलेल्या अभ्यासांतर्गत हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अंतर्गत आणि बाह्यगत दोन्ही बाजूनी माहिती गोळा करून या निष्कर्ष अंती पोहोचलो आहोत. हा आजार अभूतपूर्व असून यामध्ये अनिश्चतता भरपूर आहे त्यामुळे आम्ही केलेल्या भाकीत तंतोतंत खरेच ठरेल असे नाही” असे स्पष्ट केले आहे.