Home राष्ट्रीय विंग कमांडर अभिनंदन यांना पाककडुन वाईट वागणूक मिळत असल्याचा संरक्षण मंत्रालयाच्या...

विंग कमांडर अभिनंदन यांना पाककडुन वाईट वागणूक मिळत असल्याचा संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा दावा.

0

प्राईम नेटवर्क : बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेल्या बॉम्बफेकीनंतर पाकिस्तानी हवाई दलाची दोन विमाने भारतीय हद्दीत घुसखोरी करून आल्यावर त्यांना पिटाळून लावताना भारतीय हवाई दलाचे मिग २१ बायसन विमान पाक हद्दीत पडून पायलट विंग कमांडर अभिनंदन यांना पाक सेनेने ताब्यात घेतले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासोबत पाकने वाईट व्यवहार केल्याचा दावा केला आहे. प्रथम अभिनंदन यांना तिथल्या रहिवाशांनी वाईट वागणूक देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर अभिनंदन यांना चांगली वागणूक दिल्याचे काही व्हायरल फोटो आणि व्हिडिओंमधून यापूर्वी पाकिस्तानकडून दाखवण्यात आले होते.आणखी एका व्हिडीओ मध्ये ते डोळ्यावर पट्टी बांधलेले आणि चेहऱ्यावर रक्त अश्या अवस्थेत दिसत आहेत. त्यादरम्यान त्याची सत्यता समोर आली नव्हती.

याबाबत माहिती देताना संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी म्हणाले,”भारताच्या सैन्य तळांवर पाकिस्तानने हवाई हल्ला केला. त्याचबरोबर जिनिव्हा कराराचे पाकिस्तानी सैन्याने उल्लंघन करताना भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांना वाईट वागणूक दिली आहे.”

त्याचबरोबर जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानी लष्कर पोसत आहे. तसेच मसूद अजहर सारख्या दहशत पसरवणार्‍या म्होरक्याला पाकिस्तानकडून आपल्या देशात आश्रय दिला जात असल्याचा आमचा ठाम विश्वास आहे, असेही संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.