Home राष्ट्रीय “मुस्लिम व्यक्तींनी सॅनिटायझर वापरू नये कारण त्यात दारू असते”, मौलवींचा फतवा जारी

“मुस्लिम व्यक्तींनी सॅनिटायझर वापरू नये कारण त्यात दारू असते”, मौलवींचा फतवा जारी

0

गेल्या चार महिन्यांपासून कोरोना विषाणू संबधी प्रतिबंधित कार्य म्हणजे लागू केलेलं लॉकडाऊन, आता देशाची आर्थिक घडी सुधारवण्यासाठी हळू हळू काही गोष्टींना मुभा देण्यात येत आहे. आता जारी केलेल्या लॉकडाऊन मध्ये धार्मिक स्थळांना नियमांना बांधील राहून सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण उत्तर प्रदेश मधील बरेली जिल्ह्यात मौलाविनी अजब फतवा जारी केला आहे. मुस्लिम व्यक्तींनी सॅनिटायझर चा वापर करू नये तसेच ते लावून मशिदी किंवा दर्ग्यात जाऊ नये, यामागे कारण सांगताना सॅनिटायझर मध्ये दारू असल्याचे ते सांगतात आणि इस्लाम मध्ये दारू प्राशन हे हरम किंवा पाप मानले जाते.

बरेली जिल्ह्यातील सुन्नी मरकझ दरुल इफ्त या दर्ग्याचे प्रमुख मुफ्ती नसरत फारुखी यांनी मुस्लिम व्यक्तींनी सॅनिटायजरचा वापर करु नये असं म्हटलंय. दर्गा किंवा मशिदीची स्वच्छता करण्यासाठी सॅनिटायजरचा वापर केला तर हे ठिकाण अपवित्र होईल. “आम्ही देवाचं घर अपवित्र करु शकत नाही. इस्लाममध्ये दारु पिणं हे निषीद्ध मानलं जातं. सॅनिटायजर बनवण्यासाठी दारुचा वापर केला जातो. ही गोष्ट माहिती असतानाही जर आम्ही सॅनिटायजरचा वापर केला तर ते पाप ठरेल. त्यामुळे मी सर्व दर्गा आणि मशिदीच्या इमाम यांना सॅनिटायजरचा वापर न करण्याचं आवाहन करतो आहे.” फारुखी यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

सॅनिटाइयसर च्या ऐवजी कपडे धुण्याचा साबण, वाशिंग पावडर या गोष्टींचा वापर मुस्लिम लोकांनी करावा तसेच सॅनिटायझर चा वापर पूर्णपणे बंद करावा, घराची किंवा मशिदीची साफसफाई सॅनिटायझर ने करण्यात आली तरी धर्माविरुद्ध होईल असे या मौलवींचे म्हणणे आहे.