गेल्या काही महिन्यांपूर्वी इसरोचे मंगळयान २ मिशन अगदी शेवटच्या टप्प्यात असतांना अपयशी झाले. त्यानंतर इसरोने ‘गगनयान’ मिशन चालू केले आहे. गगनयान हे भारताचं अंतराळातील पहिलं मानवी मिशन आहे अशी माहिती लोकमतच्या एका रिपोर्टवरून मिळते. मैसूरमधील डिफेन्स फूड रिसर्च लॅबमध्ये अंतराळवीरांसाठी मिशनदरम्यान लागणारे विशेष खाद्यपदार्थ तयार केले आहेत असेही मीडिया न्यूजवरून कळले. अंतराळातील गुरुत्वाकर्षण स्थिती आणि हवामान लक्षात घेऊन इडली, एग रोल, व्हेज रोल, पुलाव, ज्यूस असे वेगवेगळे पदार्थ या लॅबमध्ये बनविण्यात आले आहेत. त्यासोबतच काही भांडी आणि अंतराळात अन्न गरम करण्यासाठी विशेष ‘फूड हिटर’ देखील बनविण्यात आले आहे.
इसरोचे अध्यक्ष के. सिवन यांनी १ जानेवारीला केलेल्या भाषणात सांगितलं होतं की, “गगनयान मोहीम हे इसरोचं प्राधान्य असेल. २०२२ मध्ये भारताचं गगनयान अवकाशात झेप घेईल.” मिळालेल्या अधिक माहितीनुसार या मिशनसाठी हवाई दलाच्या ४ जणांची निवड करण्यात आली असून ते सध्या रशियामध्ये प्रशिक्षण घेत आहेत.