Home आध्यात्मिक “आजपासून भारत भारतमय झाला “; राममंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी नरेंद्र मोदींचे उद्गार

“आजपासून भारत भारतमय झाला “; राममंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी नरेंद्र मोदींचे उद्गार

0

संपूर्ण भारताला आतुरता लागून असलेला अयोध्येतील राममंदिराचा भूमिपूजन सोहळा ठरल्याप्रमाणे ५ ऑगस्ट २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना नरेंद्र मोदींनी आजच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान त्यांना दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार व्यक्त केले. या सोहळ्याच्या निमित्ताने राम मंदिराची टपाल तिकिटे बनवण्यात आली आहेत त्यांचं सादरीकरण देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं.

‘सियावर राम चंद्र की जय’ अशी घोषणा करून मोदींनी आपल्या संबोधनाला सुरुवात केली. त्यावेळी बोलतांना मोदी पुढे म्हणाले, ” आज खऱ्या अर्थाने भारत भारतमय झाला आहे. संपूर्ण भारत रोमांचित आहे, प्रत्येकजण भावूक झाला आहे. कितीतरी दशकांची व लोकांची प्रतिक्षा आज संपली आहे.”
तसेच “राम मंदिर हे भारतीय पारंपरिक परंपरांचं, आपल्या भक्तीभावाचं, त्यागाचं आणि आपल्या राष्ट्रीय भावभावनांचं प्रतीक असेल व ते आपल्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील” असे मोदी म्हणाले.

देशभरातून आजच्या सोहळ्याचे स्वागत केले जात असून अनेक लोकांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने ‘जय श्रीराम’ असे ट्विट केले.

तसेच दूरदर्शन वरील सुप्रसिद्ध रामायण या मालिकेत रामाची भूमिका केलेले अरुण गोविल यांनी देखील ट्विट करून आनंद व्यक्त केला.